फार पूर्वी कोणीतरी विचारलं, " तूं हल्ली काय करतोस?" माझं उत्तर "नोकरी". " मग काय? नोकरी एके नोकरी नां?" त्यावरून सुचलेला नोकरीचा पाढा मी माझ्याच अनुभवावरून बनवला.
नोकरी एके नोकरी. (जवळजवळ 15 वर्षे एकेच ठिकाणी नोकरी केली)
नोकरी दूणे "बेजार" ( नोकरी करून कंटाळ्लो).
नोकरी त्रीक "धडाडी" (स्वतंत्र उद्योग करावा हा विचार)
नोकरी चोक "बेकार" (हेही नाहीं तेही नाहीं!)
नोकरी पांचा "पश्चात्ताप" (कपाळावर हात मारून घेतला)
नोकरी सक "उमेदवार" ( पुन्हा धोपटी घेऊन नोकरीच्या शोधात)
नोकरी सत्ते "साडेसाती" (स्पष्टीकरण नको)
नोकरी आठा "उपासमार" ( स्वत:ची आणि कुटुंबीयांची)
नोकरी नव्वे "नवे आजार" ( आतापर्यंत नावंही न ऐकलेले आजार)
नोकरी दाहे "समाप्ती" (रामनाम सत्य है!)

लोड होत आहे...
प्रतिसाद