ब्रह्मदेवाने जेंव्हा सृष्टी निर्माण केली तेंव्हा सर्व प्राणीमात्रांना एकसमान 30 वर्षे आयुष्य दिलं. गाढव आपलं पेटिशन घेऊन ब्रह्मदेवाकडे गेलं. "मला नकोत 30 वर्षे आयुष्य. ओझी वहायची आणि मूर्ख म्हणवून हिणवून घ्यायचं!" ब्रह्मदेवाला त्याची दया आली. त्याने 10 वर्षे कमी केली. गाढवाच्या यशामुळे कुत्र्याला धीर आला. त्याने आपलं पेटीशन ब्रह्मदेवाकडे नेलं." मालकाची मर्जी राखावी लागते, इतकं करून हडहड सहन करून घ्यावी लागते" देवाने त्याची 10 वर्षे कमी केली. नंतर माकड देवापुढे गेलं. " मला आपल्या तालावर नाचवलं जातं आणि चेष्टेचा विषय केला जातो". देवाने त्याची 10 वर्षे कमी केली. माणूस देवापुढे गेला. " तुलाही आपलं आयुष्य कमी करून घ्यायचं आहे कां?" -देव. "नाहीं. मला माझं आयुष्य वाढवून पाहिजे. पहिली 30 वर्षे मला करीयर घडवायला अपुरी पडतात. नंतर लग्न, संसार, वगैरे" देवाने माणसाची मागणीही पूर्ण केली.
माणूस पहिली 30 वर्षे माणसाप्रमाणे जगतो.
त्यानंतरची 10 वर्षे गाढवाप्रमाणे गधे-मजूरी करतो
त्यानंतरची 10 वर्षे कुत्र्याप्रमाणे घराची रखवाली करतो.
आणि उरलेलं आयुष्य माकडाप्रमाणे माकडचेष्टा करून थट्टेचा विषय बनतो!!
अनिल

लोड होत आहे...
प्रतिसाद